मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी ८ दिवसांसाठी कोल्हापूर शहरातील निर्बंध हटवले ! – सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर, ५ जुलै – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी ८ दिवसांसाठी कोल्हापूर शहरातील निर्बंध हटवले आहेत. ५ जुलैपासून अत्यावश्यक सेवांसमवेत इतर सर्व दुकाने आणि आस्थापना चालू ठेवण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे. ही अनुमती ५ ते ९ जुलै या कालावधीत सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत देण्यात आली आहे. ८ दिवसांनंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापुरातील ‘पॉझिटिव्हिटी रेट’ आणि रुग्णसंख्या याविषयी प्रभारी जिल्हाधिकारी यांनी शासनाला दिलेले पत्र आणि जनभावनेचा विचार करून ८ दिवसासांठी निर्बंध हटवले आहेत. असे असले तरी सर्व काही चालू झाले आहे, असे समजून नागरिकांनी आवश्यकता नसतांना घराबाहेर पडू नये, तसेच विनाकारण गर्दी करू नये. यामुळे जर रुग्णसंख्या वाढली, तर शासनाला पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय दुर्दैवाने घ्यावा लागेल.’’