मोजक्या वारकर्यांच्या उपस्थितीत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे प्रस्थान !
पिंपरी – कोरोनाच्या संसर्गामुळे जमावबंदी आणि संचारबंदी यांच्या नियमांचे पालन करून मोजक्या वारकर्यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान वीणा मंडपातून आजोळघरी झाले. माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात पहाटे काकड आरती, पवमान अभिषेक आणि कीर्तन सेवा होऊन हरिनामाच्या गजरात पालखीचे प्रस्थान झाले. माऊलींच्या पादुका १८ जुलैपर्यंत आळंदी येथे मुक्कामी रहाणार असून १९ जुलै या दिवशी विशेष बसने त्या पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.