पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण !
कोल्हापूर – युवासेनाप्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने युवासेनेच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे वृक्षारोपण करण्यात आले. याचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी केले होते. या वेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, युवासेना विस्तारक डॉ. सतीश नरसिंग, चिटणीस सुमित पवार, वैभव जाधव, शेखर बारटक्के, कुणाल शिंदे, युवतीसेनेच्या शितल कालगोटे, करुणा सुतार, तेजश्री पाटील तसेच अन्य उपस्थित होते.