सदैव मनास लागो तुझ्या चरणांची आस ।
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आणि ५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. वेदिका दहातोंडे हिचा ९ मे २०२१ या दिवशी वाढदिवस झाला. ‘वाढदिवसानिमित्त साधनेसाठी कोणते उद्दिष्ट ठरवू ?’, या विचारात असतांना तिला सुचलेले काव्य पुढे दिले आहे.
करण्या गेले संकल्प वाढदिवसाचा ।
मज अल्प मतीला शब्द सुचेना ।।
जाते देवास शरण ।
तूच दिशा दे मज नाथा ।। १ ।।
स्मितहास्य करूनिया देव तो ।
मजकडे पाही करुणामय दृष्टीने ।।
दृष्टी हटेना त्या सुंदर मुखावरची ।
आणखी काय राहिले मिळवण्याचे ।। २ ।।
सर्व दिले आहे त्या परम दयाळू गुरुमाऊलीने ।
न दिले, ऐसे काही न राहिले ।।
प्रार्थिते त्या माऊलीचरणी ।
मायेत नको अडकवूस या मनासी ।। ३ ।।
साधकांमध्ये माऊली, तुझे रूप पहाण्यास अल्प पडते ।
तरी सावरून घेशी, कृपा तुझी अखंड मस्तकी असते ।।
जाणीव याची क्षणोक्षणी रहावी मजला ।
तूच शिकव मज माऊली, भावानंदात डुंबण्या ।। ४ ।।
तुझे शब्द तुला अर्पण करते देवा ।
पुरा करूनी घे हा संकल्प तूच ।।
कृतज्ञ राहीन दिशादर्शन करण्याविषयी ।
सदैव मनास लागो तुझ्या चरणांची आस ।। ५ ।।
परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. वेदिका अशोक दहातोंडे (वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.५.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |