आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ, प्रश्नोत्तराची संधी नसल्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला ५ जुलैपासून प्रारंभ होत आहे. सध्या राज्यापुढे कोरोनाचे संकट, नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेली शेतकर्यांची हानी, मंत्रीमंडळातील नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, पायी वारीला घालण्यात आलेली बंदी आदी महत्त्वाचे विषय आहेत; मात्र हे विषय मांडण्यासाठी लक्षवेधी आणि प्रश्नोत्तरे यांसाठी अधिवेशनात वेळ देण्यात आलेला नाही. त्यामुळे हे सर्व प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.