धर्मांधांच्या आतंकवादी कृत्यांकडे हिंदूंनी बारकाईने लक्ष ठेवायला हवे !
‘मराठवाड्याचे आतंकवादी कनेक्शन’ या शीर्षकाखाली बीडच्या इरफान शेख याच्या अटकेसंबंधीचे एक वृत्त प्रसारमाध्यमांनी नुकतेच दाखवले. मराठवाड्यातील असे जे धर्मांध तरुण आतंकवादी कृत्यांसंबंधी सापडत आहेत, त्यांच्या पूर्वजांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे खिलाफत चळवळीत सहभागी झालेल्यांची अन् निजामाच्या काळातील रझाकारांशी काही संबंध आहेत का ? याचे गुप्तचर यंत्रणांनी अन्वेषण करणे आवश्यक वाटते. विशेषत: मराठवाडा, तेलंगाणामध्ये फोफावलेले एम्.आय.एम्.चे कार्यकर्ते आणि अल्पसंख्यांक भागातून निवडून येणारे लोकप्रतिनिधी यांच्याकडे हिंदूंनी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती सोडून आपापल्या परिसरातील ‘अशा’ स्वरूपाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवायला हवे, तसेच जी काही गोष्ट आढळेल, ती तात्काळ शासनाच्या आणि स्थानिक हिंदु लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून देणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदूंच्या सणांच्या उत्सवांच्या वेळी आणि तशाच स्वरूपाच्या इतर प्रसंगांच्या वेळी एकत्र येणार्या हिंदूंनी त्या दृष्टीने जागरूक रहायला हवे.
– श्री. श्रीकांत ताम्हणकर, पुणे (३०.६.२०२१)