हरियाणातील नोएडा आणि गुरुग्राम येथील साधकांना गुरुपौर्णिमेनिमित्त दाखवण्यात आलेला ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना आलेल्या अनुभूती
१. सौ. गरिमा सिन्हा, नोएडा, हरियाणा.
अ. ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला पुष्कळ उत्साह वाटत होता. त्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केलेल्या नैवेद्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावर लावलेले मोरपीस पडले. ते पाहून पुष्कळ चांगले वाटत होते.
आ. सत्संग संपल्यावर माझे मन प्रसन्न होते.
इ. ‘सेवा आणि साधना करण्यासाठी माझी प्राणशक्ती वाढली आहे’, असे मला वाटले.
ई. ‘सत्संग ऐकल्याने मला आध्यात्मिक लाभ झाले’, असे मला जाणवले.’
२. सौ. पूनम सत्यार्थी, गुरुग्राम, हरियाणा.
अ. ‘या वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त दाखवण्यात आलेला ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या माझ्या मुलाचे मला संपूर्ण सहकार्य मिळाले. त्याने पुष्कळ आनंदाने कार्यक्रम पाहिला.
आ. ‘कार्यक्रम रामनाथी आश्रमात बसून पहात आहे’, असे मला वाटले. त्या वेळी मला पुष्कळ हलके वाटत होते.’ (जुलै २०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |