फिलिपीन्सचे सैनिकी विमान कोसळून १७ जणांचा मृत्यू

मनिला (फिलिपीन्स) – फिलिपीन्समध्ये ८५ लोकांना घेऊन जाणारे सैनिकी विमान धावपट्टीवर उतरतांना झालेल्या अपघातामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले.

सैन्यदलप्रमुख सिरिलीटो सोबेजाना यांनी सांगितले, ‘मी देवाला प्रार्थना करतो की, यामध्ये कमीत कमी लोकांची हानी व्हावी. यांतील अधिकाधिक लोकांनी नुकतेच मूलभूत सैनिकी प्रशिक्षण घेतले होते.’ या लोकांना आतंकवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या ‘आयलँड्स’ बेटांवर तैनात केले जाणार होते. फिलिपीन्सच्या या बेटांवर मुसलमान बहुसंख्य आहेत. (जेथे मुसलमान बहुसंख्य असतात, तेथेच आतंकवादी कारवाया का होतात ? याचे उत्तर निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी देतील का ? – संपादक) येथे एखाद्याला खंडणीसाठी पळवून नेणे सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे येथे अधिकाधिक सैनिक तैनात असतात. येथे अबु सैफ ही आतंकवादी संघटना सक्रीय आहे.