कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मासांत टोक गाठू शकते ! – तज्ञांचा अंदाज
नवी देहली – भारतियांनी कोरोनासंबंधी नियमांचे पालन न केल्यास कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मासांपर्यंत टोक गाठू शकते; मात्र दुसर्या लाटेत प्रतिदिन जितक्या रुग्णांची नोंद झाली त्या तुलनेत तिसर्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या निम्मी असण्याची शक्यता आहे, असे कोरोनासंबंधीच्या सरकारी गटातील एका शास्त्रज्ञाने म्हटले आहे. म्हणजे तिसर्या लाटेत देशात कोरोनाचे दीड ते २ लाख रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या मध्यापर्यंत दुसरी लाट नगण्य होण्याची शक्यता आहे.
Third wave of #Covid may see half the daily cases reported during second wave, says govt panel scientist | #ThirdWaveCovid #CoronavirusIndia https://t.co/xdAzJeqUgu
— IndiaToday (@IndiaToday) July 4, 2021