इंडोनेशियामधील आदिवासी हिंदू करतात ज्वालामुखीच्या ठिकाणी श्री गणेशाची पूजा !
जकार्ता (इंडोनेशिया) – येथे प्राचीन काळापासून ‘यद्रया कसाडा’ नावाच्या धार्मिक उत्सवाचे आयोजन केले जाते. इंडोनेशियामध्ये रहाणारे हिंदु आदिवासी हे ‘टेंगर’ नामक जातीतील असून ते पूजा करण्यासाठी पूर्व जावा येथील प्रोबोलिंगगो येथे असणार्या माउंट ब्रोमो ज्वालामुखीला जातात. तेथे ते श्री गणेशाची पूजा करतात. या वेळीही त्यांनी तेथे जाऊन श्री गणेशाची पूजा केली. देवाला प्रसन्न करण्यासाठी हे लोक ज्वालामुखीवर प्रसाद अर्पण करतात. यांत धान्य, भाज्या, पशु आणि पक्षी यांना अर्पण केले जाते. त्यांची श्रद्धा आहे की, सैतानाला शांत करण्यासाठी मांस आणि भात यांचा भोग दाखवला पाहिजे. अशा प्रकारचा प्रसाद अर्पण केल्यास ज्वालामुखीचा स्फोट होत नाही आणि येथील लोक सुरक्षित रहातात. (इंडोनेशियामध्ये अंनिससारख्या संघटना नाहीत, अन्यथा या हिंदूंचा त्यांनी विरोध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असती ! – संपादक)
येथील ३० गावांमध्ये टेंगर जातीचे अनुमाने १ लाख लोक रहातात. ते स्वतःला हिंदू समजतात. इंडोनेशियात शेवटचे शासन करणारे भारतीय वंशाचे राजे माजापहित राजकुमार यांचे वंशज असल्याचे ते स्वत:ला मानतात. ते आजही जंगलात राहून मांसाहार आणि शाकाहार असे दोन्ही करतात. ते हिंदु धर्माच्या व्यतिरिक्त बौद्ध धर्मालाही मानतात. ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्यासह भगवान बुद्धांचीही तेथे पूजा केली जाते.