सनसनाटी बातमीसाठी पत्रकारांकडून एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या दाढेत ढकलण्याची अपेक्षा करता येत नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय
धर्मांध पत्रकाराच्या सांगण्यावरून विधानभवनासमोर आत्मदहन करण्याचे नाटक करतांना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
अशा प्रकारे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणार्या पत्रकारांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर ती चुकीची ठरणार नाही !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे शमीम अहमद या पत्रकाराने सनसनाटी बातमीसाठी एका व्यक्तीला आत्मदहन करण्याचे नाटक करण्यास सांगितल्यावर यात तिचा मृत्यू झाला. या घटनेच्या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या दाढेत ढकलून त्याची बातमी करण्याची अपेक्षा पत्रकाराकडून केली जाऊ शकत नाही’, असे सांगत या पत्रकाराला जामीन नाकारला. या पत्रकाराने या व्यक्तीला राज्याच्या लक्ष्मणपुरी येथील विधानभवनासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यासाठी बाध्य केले होते. ‘या घटनेचा व्हिडिओ बनवून तो दूरचित्रवाहिन्यांवर प्रक्षेपित करण्यात येईल’, असे शमीम याने सांगितले होते.
१. मृत व्यक्तीला घरमालकाने घर रिकामे करून जाण्यास सांगितले होते. त्या वेळी या व्यक्तीने त्याच्याकडे सध्या पैसे नाहीत, असे सांगितले होते. त्यावर मालकाने ‘घर खाली कर किंवा स्वतःला पेटवून मर’, असे सांगितले होते.
२. पत्रकार शमीम याने या व्यक्तीला, ‘त्याने जर विधानभवनासमोर जाऊन स्वतःला पेटवून घेण्याचे नाटक केले, तर मी त्याचा व्हिडिओ बनवून दूरचित्रवाहिन्यांवरून प्रक्षेपित करीन. मग कुणीही तुला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार नाही’, असे आमीष दाखवले होते. त्यानुसार या व्यक्तीने विधानभवनासमोर केले; मात्र यात ही व्यक्ती अधिक भाजल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी व्यक्तीच्या पत्नीने शमीम याच्या विरोधात तक्रार केल्यावर त्याला अटक करण्यात आली.