मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे !
‘नुकतेच महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत ‘कुठले देवस्थान कुणाला देण्यात येणार, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले’, असे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानुसार पंढरपूर देवस्थान काँग्रेसकडे, तर शिर्डी देवस्थान राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार आहे. मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर यापूर्वीच शिवसेनेला देण्यात आले आहे. श्री महालक्ष्मी मंदिरासह ३ सहस्रांहून अधिक मंदिरे असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आपल्याला मिळावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केली आहे.’