ऊठ भगिनी रणरागिणी हो !
ऊठ भगिनी जागी हो ।
अबला नको रणरागिणी हो ॥
हतबल, हताश अन् निराश नको ।
सतर्क, दक्ष अन् शक्तीशाली हो ॥ १ ॥
भस्मासूर वाढू लागला ‘लव्ह जिहाद’चा ।
दिवसाढवळ्या घडतात घटना बलात्काराच्या ॥
वारंवार कानी पडतात वार्ता हिंदूंवरील अत्याचाराच्या ।
महिलांच्या किंकाळ्या फुटती, आक्रोश होई प्रत्येक हिंदूचा ॥ २ ॥
इतके सर्व होऊनी तू का शांत आहेस माते ।
आज हिंदूंच्या प्रत्येक पावलागणिक आहेत काटे ॥
अत्याचाराची कहाणी सांगता कंठ आमुचा दाटे ।
‘धीर दे तू, तूच हो आधार’, असे प्रत्येक हिंदूला वाटे ॥ ३ ॥
‘चूल आणि मूल’ हा संकुचित विचार सोड तू ।
सारे हिंदू तुझीच बालके, हे आतातरी जाण तू ॥
जागृत करूनी स्वतःतील शक्तीतत्त्व तू ।
तुझ्या लेकरांचे रक्षण करण्या सज्ज हो तू ॥ ४ ॥
शक्तीतत्त्वाची करी तू उपासना ।
तारक रूपासह मारक रूपाची कर तू साधना ।
शस्त्र घे हाती आता नराधमांचा नाश करण्या ॥ ५ ॥
थांबू नको एकही क्षण आता ।
वेगाने धाव तू आता रणांगणात ॥
स्फुल्लिंग जागवूनी हिंदूंच्या नसांनसांत ।
‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ची गर्जना आसमंतात ॥ ६ ॥
गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवूनी धर्मरक्षणार्थ झोकून देई ।
गुरुसंकल्पाने हिंदु राष्ट्र स्थापना निश्चितच होई ॥ ७ ॥
– श्रीकृष्णाची सुप्रिया (कु. सुप्रिया सतीश जठार), बेळगाव