स्त्री-पुरुष समानतेचा भ्रम !
हिंदु, ख्रिस्ती आणि मुसलमान यांचे स्त्री संदर्भातील वागणे
१. ‘हिंदु ‘एकपत्नीव्रत’ आदर्श असल्याचे मानतो.
२. ख्रिस्ती व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करतात.
३. मुसलमान चार पत्नी करू शकतात. मुसलमान बादशहांच्या जनानखान्यात शेकडो मुली असत.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
नावाआधी मुलींनी ‘कु.’ आणि स्त्रियांनी ‘सौ.’ लिहिण्याचे लाभ !
‘यातून मुलींकडून पुरुषांना अप्रत्यक्षपणे सुचवले जाते, ‘मी अजून अविवाहित आहे’ आणि पुरुषांना प्रत्यक्षपणे जाणवते, ‘ती अजून अविवाहित आहे.’ तसेच स्त्रियांकडून पुरुषांना अप्रत्यक्षपणे सुचवले जाते, ‘मी विवाहित आहे’ आणि पुरुषांना प्रत्यक्षपणे जाणवते, ‘ती विवाहित आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
स्त्रीला श्रेष्ठ मानणारा मनु (हिंदु धर्म) आणि स्त्रीला जनावरापेक्षा अधिक मूल्य नसणारे इतर पंथ !
‘कन्फ्युशिअस, ॲरिस्टॉटल, मिल्टन आणि प्रगतीवादी रुसोही स्त्रीला कनिष्ठ मानतात. इस्लामचे सर्वांगांनी अंगीकरण करणार्या खोमेनीच्या इराणमध्ये स्त्रीला जनावरापेक्षा अधिक मूल्य नाही. या शहाण्यांपेक्षा मनू नारीमहिमा मुक्त कंठाने गातो.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २०१०)