युवती आणि महिला यांची सद्य:स्थिती !
कुटुंबाचा प्राण असलेली स्त्रीच भ्रष्ट झाल्याने भारताचे भविष्य अंधःकारमय होणे
‘शील आणि धर्म विसरलेल्या या मुलींकडून धर्माची, तसेच हिंदुत्वाची विटंबना होत आहे. यामुळे राष्ट्र परिणामी देशही रसातळाला निघाला आहे. कुटुंबाचा प्राण असलेली स्त्रीच भ्रष्ट झाल्याने भारताचे भविष्य अंधःकारमय झाले आहे.’ – एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून (५.४.२०११), दुपारी ३.१५)
संस्कृतीहीन पाश्चात्त्य स्त्रिया आणि राष्ट्रे !
‘पाश्चात्त्य स्त्रियांनी जगाला असभ्यता, अश्लीलता आणि चारित्र्यहिनता दिली. याउलट हिंदु स्त्रियांनी जगाला सभ्यता, सुसंस्कृतता आणि धर्मशीलता दिली. एवढेच नव्हे, तर जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांसारख्या विरांगनांनी जगाला पराक्रम आणि राजधर्मही शिकवला. स्त्री म्हणजे राष्ट्राच्या संस्कृतीचा जणू आरसा ! ज्या पाश्चात्त्य राष्ट्रांच्या स्त्रियांची अशी केविलवाणी स्थिती आहे, त्या पाश्चात्त्यांच्या तथाकथित संस्कृतीचे अंधानुकरण करायला आम्हाला लाज कशी वाटत नाही ?’ – पू. संदीप आळशी (१२.४.२०१७)
स्त्रिया स्त्रीधर्म विसरल्या आहेत !
‘काय दिवस आले आहेत ? स्त्रिया आपले सौंदर्य जाईल; म्हणून कोवळ्या जन्म दिलेल्या बालकाला दूध पाजत नाहीत. सध्या हे पाप चालू आहे. देवाने निर्माण केलेले मुलासाठी त्याच वेळी सिद्ध झालेले दूध त्या पाजत नाहीत. मग मुले आईवर प्रेम कशी करणार ? सध्या ही काही ठिकाणी नवरुढी (‘फॅशन’) आली आहे. ‘फॅशन’ असावी; परंतु फाजिल नसावी. लग्न झाले आहे, हे दिसू नये; म्हणून स्त्रिया पंजाबी किंवा पाश्चात्त्य पोशाख वापरतात. मंगळसूत्र घरी काढून नोकरीला जातात. कुंकू लहान हिरकुटाने लावतात. ते दिसतही नाही. आमच्या हिंदु धर्मात पूर्वी कुंकवाला मोठा मान होता. बाईच्या कपाळाला चंद्रासारखे गोल मोठे कुंकू असावे. त्यामुळे ‘नवर्याचे आयुष्य वाढते’, असे म्हणत असत. सध्या टिकल्या लावतात. एक म्हातारी म्हणते, ‘टिकल्या लावून टिकशील काय ग बाय ?’ हिंदु स्त्रियांनी आपला स्वधर्म पाळावा. पाश्चात्त्य परदेशी संस्कृतीच्या मागे धावू नये.’
– पू. (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.