पुष्कर सिंह धामी होणार नवीन मुख्यमंत्री !

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचे तांत्रिक कारणामुळे त्यागपत्र

डावीकडून पुष्कर सिंह धामी

देहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. रावत हे केवळ ४ मासांसाठीच मुख्यमंत्री ठरले. रावत हे खासदार होते आणि त्यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर ६ मासांमध्ये विधीमंडळावर निवडून येणे आवश्यक होते; मात्र कोरोना संकटामुळे निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याने रावत यांना त्यागपत्र देण्याची वेळ आली. त्यामुळे ३ जुलै या दिवशी झालेल्या भाजपच्या सर्व आमदारांच्या बैठकीत आमदार पुष्कर सिंह धामी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. या वेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि पक्षाचे राज्याचे प्रभारी दुष्यंत कुमार गौतम हे उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे नवीन मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ केवळ ७ – ८ मासांचाच असणार आहे.