पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांतील सरकारी यंत्रणा वर्ग होणार
पुणे – पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांतील सरकारी रुग्णालये, शाळा, पाणी योजना, अंगणवाड्या, अधिकारी आणि कर्मचारी यांना महापालिकेत वर्ग करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच नव्याने समावेश होणार्या २३ गावांतील रहिवाशांकडून हरकती-सूचनांचा अभिप्राय स्थानिक प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. पुणे महापालिकेतील विविध प्रश्नांवर पवार यांच्या उपस्थितीत १ जुलै या दिवशी मुंबईत ही बैठक झाली. त्या वेळी मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
हद्दीलगतची ११ गावे पालिकेत घेऊन ४ वर्षे झाली, तरीही ती गावे जिल्हा परिषदेकडे होती. त्यामुळे महापालिकेच्या कामात अडचणी येत असून त्याचा गावकर्यांना त्रास होत होता.