नागपूर येथे कोरोनाच्या तुलनेत ‘म्युकरमायकोसिस’ आजाराचा मृत्यूदर सहापट !
नागपूर – विदर्भातील कोरोनासह ‘म्युकरमायकोसिस’चे (काळी बुरशी) सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहेत. येथे कोरोनाच्या आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदर १.५९ टक्के असतांनाच ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदर सहापट म्हणजेच ९.५७ टक्के आहे. नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत ‘म्युकरमायकोसिस’चे १ सहस्र ६०८ रुग्ण आढळले. एकूण १५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’च्या १ सहस्र १९५ रुग्णांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयांत विविध शस्त्रकर्म झाले असून उपचारानंतर १ सहस्र १२७ रुग्णांना दोन्ही रुग्णालयांतून सुट्टी दिली गेली.