नागपूर येथील अधिवक्ता परमार यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात ‘ईडी’कडे तक्रार !
नागपूर – येथील अधिवक्ता तरुण परमार यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह नागपूर येथील काही प्रशासकीय अधिकार्यांविरुद्ध तक्रार केली आहे. यामध्ये आर्थिक अपव्यवहारासह अनेक आरोप करण्यात आले आहेत. ‘या अनुषंगाने २ दिवसांपूर्वी मला ‘ईडी’ कार्यालयात चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. अनुमाने ३ घंटे ‘ईडी’च्या अधिकार्यांनी माझ्याकडील पुराव्यांविषयी माहिती जाणून घेतली’, असा दावा अधिवक्ता परमार यांनी केला आहे. ‘माझे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून या आधी मी भाजपच्या काही आमदारांविरुद्धही तक्रार केली होती’, असेही अधिवक्ता परमार यांनी स्पष्ट केले.
अनिल देशमुखांनंतर नितीन राऊत EDच्या निशाण्यावर, तरुण परमार यांची EDकडे तक्रार#AnilDeshmukh #EDRaid #NitinRaut pic.twitter.com/roVAzvJREb
— Mumbai Tak (@mumbaitak) June 30, 2021