पाकमधील थेट भारतीय उच्चायुक्तालयावर आढळले ड्रोन !
भारताकडून तीव्र निषेध !
|
इस्लामाबाद – जम्मूमध्ये विविध ठिकाणी पाकचे ड्रोन आढळून आल्यानंतर आता पाकमधील थेट भारतीय उच्चायुक्तालयाच्या परिसरात ड्रोन आढळून आले. पहिल्यांदाच भारतीय उच्चायुक्तालय आणि अधिकारी यांच्या निवासावर ड्रोन दिसून आले. इस्लामाबादमधील हा परिसर अतिशय सुरक्षित समजला जातो. या परिसरात ही घटना समोर आल्याने भारतीय अधिकार्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच भारताकडून या घटनेचा पाककडे तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे.
इस्लामाबाद में भारतीय दूतावास के ऊपर उड़ता दिखा Drone#Video https://t.co/GJ4jCjY7yi
— AajTak (@aajtak) July 2, 2021
सूत्रांच्या माहितीनुसार ड्रोन घिरट्या घालत असतांनाच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास सध्या चालू आहे. ड्रोन आक्रमणाचे सूत्र भारताने काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांसमोर उपस्थित केले होते. ‘आतंकवाद्यांकडून ड्रोनचा केला जात असलेला वापर अतिशय चिंतेची गोष्ट आहे. जर या संदर्भात कोणतीच ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर आतंकवादाविरोधातील लढाईत जिंकणे अतिशय कठीण होऊन बसेल’, असे भारताने म्हटले होते.
भारताच्या निषेधाला पाककडून केराची टोपली !या घटनेवरून भारताने पाककडे तीव्र निषेध नोंदवूनही पाकने त्याची साधी दखलही घेतली नसल्याचे समोर आले. पाकच्या सरकारी स्तरावरील एकाही उत्तरदायी अधिकार्याकडून भारताला याविषयी काहीही उत्तर दिले गेले नाही. |
जम्मू-काश्मीरमध्ये भारताने एक पाकिस्तानी ड्रोन पिटाळून लावले !दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील आरनिया सेक्टर येथील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय सीमेत घुसखोरी करणार्या एका पाकिस्तानी ड्रोनवर भारतीय सैनिकांनी गोळीबार करून ते पिटाळून लावले. गेल्या काही दिवसांत १० वेळा ड्रोन उडतांना दिसून आले आहे. |