सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई !
सातारा, २ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्रकुमार घाडगे यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
BREAKING: अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त; ईडीची मोठी कारवाई#SugarFactory #AjitPawarRelative #Satara https://t.co/f22NuOFNFq
— News18Lokmat (@News18lokmat) July 1, 2021
महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये २५ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन नंतर परत न करता बुडवले आहे. तसेच नंतर अल्प मुल्यामध्ये साखर कारखान्यांची विक्री करण्यात आली आहे. याविषयी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका प्रविष्ट केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंद केला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.