जगासमोर आदर्श ठरणारे एका वराचे नववधूविषयीचे विचार !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

एका विवाहामध्ये वधूला वरमाला घालण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर वराने वधूच्या चरणांवर आदराने मान झुकवून तिला नमस्कार केला. तेव्हा विवाह समारंभात उपस्थित असलेले सर्व जण स्तब्ध झाले.

तेव्हा वराने उत्तर दिले,

१. ती (वधू) तिच्या आई-वडिलांना सोडून माझ्या समवेत आली आहे.

२. तिने तिचे नातेसंबंध तोडून माझ्याशी नाते जोडले आहे.

३. ती माझ्या घरातील लक्ष्मी म्हणून ओळखली जाईल.

४. ती माझ्या आई-वडिलांचा मान राखील आणि त्यांची सेवा करील.

५. तिच्या आचरणाने समाजात माझी ओळख निर्माण होईल.

६. ती (वधू) माझा वंश वाढवील.

७. ती मला वडील बनण्याचे सुख प्राप्त करून देईल.

८. ती प्रसुतीच्या वेळी माझ्या बाळासाठी मृत्यूला शिवून येईल.

ती जर एवढे सर्व करू शकते, तर आपण तिचा थोडा मानही राखू शकत नाही का ? अशा स्त्रीच्या चरणी मान झुकवणे हास्यास्पद असेल, तर मला जगाची पर्वा नाही.

(संदर्भ : इंडिया डॉट कॉम संकेतस्थळ)