सामाजिक कार्यकर्ते उमेश हारगे यांच्याकडून गरीब रुग्ण, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांना ७ लाख रुपयांचे साहाय्य !
मिरज – कोरोना महामारीच्या गेल्या दीड वर्षात काळात अनेक गरीब रुग्ण, परिचारिका, आशासेविका, आरोग्य कर्मचारी आणि पीडित यांना ७ लाख रुपयांचे सहाय्य सामाजिक कार्यकर्ते श्री. उमेश हारगे यांनी केले आहे. हे साहाय्य त्यांनी स्वत:चे पैसे व्यय करून केले आहे. या साहाय्यात वाफेचे यंत्र, मास्क, प्राणवायू यंत्रणा, सॅनिटायझर अशा वस्तूंचा समावेश आहे. या कार्याविषयी श्री. उमेश हारके यांचे परिसरातून कौतुक होत आहे.