राज्यातील ७ कोटी लाभार्थींना ५ किलो धान्य विनामूल्य मिळणार !
प्रतिमहा ३.५० लाख ‘मेट्रिक टन’ धान्य वाटप होणार !
हिंगोली – राज्यात कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने’अंतर्गत स्वस्त धान्य दुकानदारांच्या वतीने ‘अंत्योदय योजना आणि प्राधान्यक्रम’ कुटुंबातील ७ कोटी लाभार्थींना नोव्हेंबरपर्यंत प्रतिमहा ५ किलो धान्य विनामूल्य दिले जाणार आहे. त्यासाठी प्रतिमासाला ३.५० लाख ‘मेट्रिक टन’ धान्य लागणार आहे. यामध्ये १.९७ लाख ‘मेट्रिक टन’ गहू, तर १.५३ लाख ‘मेट्रिक टन’ तांदूळ यांचा समावेश आहे. या धान्य वितरणाला सरकारने संमतीही दिली आहे. या संदर्भात अन्न नागरी पुरवठा विभागाने पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत.