कोलकाता येथे धर्मांधाकडून धारदार शस्त्राने हिंदु मालक आणि त्यांचा चालक यांच्यावर आक्रमण !
मालकाने अल्प पगार दिल्याचा आरोप !
कोलकाता – कहार मोल्ला नावाच्या एका धर्मांधाने त्याचा हिंदु मालक आणि चालक यांच्यावर धारदार शस्त्राने आक्रमण केल्याची घटना येथील कसबा भागात नुकतीच घडली. मोल्ला हा कपडे बनवण्याच्या कारखान्यात कामाला आहे. मालक तुहिन कुमार डे यांनी अल्प पगार दिल्याचा राग मनात धरून त्याने डे आणि चालक शाश्वत चक्रवर्ती यांच्यावर धारदार शस्त्राने आक्रमण केले. या आक्रमणात दोघेही घायाळ झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी मोल्ला याला अटक केली आहे.
डे यांनी दिलेल्या माहितीनुसार मोल्ला याला पगार दिल्यानंतर तो पगार अल्प दिल्याचे सांगत भांडू लागला. त्यानंतर त्याने कारखान्यातच सायंकाळचा नमाज वाचला आणि लगेच येऊन दोघांवर आक्रमण केले.