गुजरात पोलिसांनी नोंदवला २ भुतांच्या विरोधात गुन्हा !

मानसिक आजार असणार्‍या व्यक्तीने केली होती तक्रार !

‘भुते नाहीत’, असे भारतातील बुद्धीप्रामाण्यवादी सांगत असतात. विदेशात याच्यावर सहस्रोंच्या संख्येने संशोधन करणारी संकेतस्थळे आहेत, तसे संशोधन करण्याचा प्रयत्न मात्र बुद्धीप्रामाण्यवादी करत नाहीत, हे लक्षात घ्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

कर्णावती (गुजरात) – राज्यातील पंचमहाल येथे वरसंग बारिया या व्यक्तीने दोन भुतांच्या विरोधात जांभूघोदा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शेतात काम करतांना भुतांची टोळी त्याच्याजवळ आली आणि त्यांतील २ भुतांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, असे बारिया याने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी यासंदर्भात चौकशी केली असता बारिया मानसिकरित्या आजारी असल्याचे समोर आले. त्याच्यावर उपचार चालू असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. (मानसिक आजारामागे आध्यात्मिक कारण असल्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींवर मानसोपचार करण्यासह आध्यात्मिक उपचार केल्यास बरे होण्याचे प्रमाण अधिक असते, हे बुद्धीप्रामाण्यवादी समजून घेतील का ? – संपादक)