परात्पर गुरु डॉक्टरांच्या चैतन्याने भरली विश्वाची पोकळी ।
‘देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ।’, अशी विख्यात कवी आणि लेखक ग.दि. माडगूळकर यांची सुप्रसिद्ध कविता आहे. त्यामध्ये ‘ईश्वर निसर्गाच्या माध्यमातून माणसाला सहस्रो हातांनी साहाय्य करतो; मात्र घेणार्याची झोळी अपुरी पडते’, असा आशय आहे. त्याचप्रमाणे साक्षात् विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले मला साधक, निसर्ग, पंचमहाभूते इत्यादींच्या माध्यमातून अनंत हस्ते साहाय्य करत आहेत. ते साहाय्य घेण्यासाठी त्यांनीच मला सक्षम झोळीही दिली आहे; म्हणजे मला पात्रही केले आहे. त्यांनी दिलेल्या चैतन्याने माझी झोळी भरून वहात आहे. त्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी पुढील कवितापुष्प कृतज्ञतापूर्वक वहात आहे.
परम पूज्यांचे (टीप १)
हात अनंत ।
परम पूज्यांचा
संकल्प ज्वलंत ।। १ ।।
करती स्वभावदोषांची होळी ।
चैतन्याने भरली
माझी झोळी ।। २ ।।
परम पूज्यांची प्रीती अपार ।
बांधली साधकांची मोळी ।। ३ ।।
परम पूज्यांचे अध्यात्म अनुभूतीचे ।
पुरोगामी करती आरोप बिनबुडाचे ।। ४ ।।
परम पूज्यांचे कवच असे अभेद्य ।
साधकांचे रक्षण होईल आपत्काळी ।। ५ ।।
परम पूज्यांचे चैतन्य अनंत ।
कार्य करतसे सर्वत्र सर्वकाळी ।। ६ ।।
परम पूज्यांचे कार्य अपार ।
हिंदु राष्ट्र स्थापती, उभारूनी संतांची फळी ।। ७ ।।
विष्णुरूपी परम पूज्यांचे हात सहस्र ।
चैतन्याने भरली विश्वाची पोकळी ।। ८ ।।
टीप १- परात्पर गुरु डॉ. आठवले
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.३.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |