मुंबईतील ५० टक्क्यांहून अधिक लहान मुलांमध्ये कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठीची प्रतिपिंडे आढळली !
मुंबई – मुंबईतील ६ ते १८ वर्षे वयोगटातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठीची प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) आढळली आहेत. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या एका सर्वेक्षणात हे आढळून आले आहे. ‘कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसेल’, असे अनुमान तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून मे आणि जून मध्ये पालिकेच्या २४ प्रभागांतील लहान मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यासाठी १० सहस्र मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.