मुंब्रा येथे पोलिसावर चाकूने आक्रमण करणारा धर्मांध अटकेत !
आरोपींवर कठोर कारवाई होत नसल्यामुळेच धर्मांध कायदा हातात घेण्याचे धाडस करत आहेत, हे लक्षात घ्या !
ठाणे, ३० जून (वार्ता.) – अनधिकृत बांधकामप्रकरणी अडथळा निर्माण करणार्या आणि गुन्हा नोंद झालेल्या आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरच चाकूने आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार्या बद्रुद्दीन याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांच्यावर आक्रमण करणे, दहशत माजवणे, त्यांना कारवाईपासून रोखणे, कायदा-सुव्यवस्थेचा फज्जा उडवणे, असे प्रकार मुंब्रा येथे सर्रासपणे घडतात.