नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या ! – मंदा म्हात्रे, आमदार

नवी मुंबई महापालिका मुख्यालय
मंदा म्हात्रे

नवी मुंबई – नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. मंदा म्हात्रे यांनी याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.

मंदा म्हात्रे म्हणाल्या की, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य असलेले धर्माभिमानी होत. समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत छत्रपती संभाजी महाराज यांनी नििर्ववाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. छत्रपती संभाजी महाराज यांची कीर्ती जनसामान्यांमध्ये रुजवावी, या दृष्टीने ही मागणी केली आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला कुणाचाही विरोध नाही. विशेष म्हणजे शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी संघटना यांनी या नामकरणाला पाठिंबा दिला आहे.