होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी यांना नृत्याचा सराव करतांना आलेल्या विविध अनुभूती
संगीत सदर ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग
१. पाय दुखत असतांना नृत्याचा सराव केल्यावर उपाय होऊन त्रास अल्प होणे
‘१६.४.२०२० या दिवशी माझे पाय पुष्कळ दुखत होते. मला आसंदीवरही बसता येत नव्हते. मला मांड्यांमध्ये अधिक वेदना जाणवत होत्या. असे असतांनाही मी एक घंटा नृत्याचा सराव केला आणि मला होणार्या वेदना पूर्णपणे थांबल्या. ‘नृत्याचा सराव करतांना सूक्ष्मातून माझ्या पायातून काहीतरी जड पदार्थ वितळून खाली पडत आहे’, असे मला जाणवले आणि पायाच्या शिरा मोकळ्या झाल्या. ही अनुभूती मी सहसाधिकेला सांगितली. त्या वेळी ती म्हणाली, ‘‘माझेही पाय दुखत होते. मी वेदनाशामक गोळ्या घेतल्या, तरी ते दुखायचे थांबले नाहीत; म्हणून मी सराव केला आणि त्रासाची तीव्रता अल्प झाली.’’ त्या वेळी ‘सरावाचा कालावधी आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या कालावधीत धरू शकता’, असे एका संतांनी सांगितले होते, त्याची प्रचीती आली.
२. नृत्याचा सराव करतांना हलके वाटणे आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय होणे
१७.४.२०२० या दिवशी मी नृत्याचा सराव करत होते. त्या वेळी मी हातांची हालचाल एक-दोन मिनिटे केली, तरी ‘ते माझ्या शरिराचे अवयव आहेत’, असे मला जाणवत नव्हते, इतके ते हलके हलके वाटत होते. वार्यावर कागद उडालेला पहातांना जसे हलके वाटते, तसे मला वाटत होते. त्या दिवशी नृत्याचा सराव करतांना हलकेपणाची जाणीव दोनदा झाली आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय अधिक प्रमाणात झाल्याचे लक्षात आले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या बालरूपातील आनंदलहरी मिळाल्यामुळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय होणे
१२.४.२०२० या दिवशी मी सराव करत असतांना मंत्रपठणाला आलेले बालसाधक तेथे बसले होते. त्यांना पाहून ‘हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बालरूप आहे’, असे मला वाटले. मी त्यांच्यासमोर ६ ते ७ मिनिटे नृत्य केले, तरी एक घंटा नृत्य केल्यानंतर जसे उपाय होतात, तसे आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाल्याचे मला जाणवले. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या बालरूपातील आनंदलहरी माझ्याकडे येत आहेत’, असे मला वाटले.’
– होमियोपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |