काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्याकडून इरफानला शाबासकी देऊन कौतुक केल्याची माहिती समोर !
उत्तरप्रदेशातील हिंदूंच्या धर्मांतरप्रकरणी बीड जिल्ह्यातील इरफान ख्वाजा खानला अटक केल्याचे प्रकरण !
बीड, ३० जून – उत्तर प्रदेशातील बेकायदा धर्मांतर ‘रॅकेट’ प्रकरणी बीड जिल्ह्यातील सिरसाळा (तालुका परळी) गावचा इरफान ख्वाजा खान याला २९ जून या दिवशी उत्तरप्रदेशातील आतंकवादविरोधी पथकाने देहलीत अटक केली. इरफान हा केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागात मूकबधीर मुलांसाठी सांकेतिक संवाद दुभाषा तज्ञ म्हणून काम करतो. विशेष म्हणजे एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे सांकेतिक भाषेत उत्तम रूपांतर केल्याविषयी इरफानला शाबासकी देऊन मोदींनी व्यासपिठावर त्याचे कौतुक केले होते.
दुभाषा म्हणून काम करता-करता इरफान याने मूकबधीर मुलांना आमीष दाखवून त्यांचे बेकायदा धर्मांतर केल्याचा ठपका उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याच्यावर ठेवला आहे. सिरसाळा गावातील जायकवाडी वसाहतीत इरफानचे घर आहे. इरफानचे वडील राज्य परिवहन महामंडळात ‘मेकॅनिक’ होते. दुसरीकडे या प्रकरणात इरफानला अकारण गोवल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.