गोव्यात अन्यत्र वादळामुळे पुष्कळ ठिकाणची झाडे मोडून पडलेली दिसणे; मात्र सनातनच्या रामनाथी आश्रमातील वातावरण एकदम स्थिर असून तेथील छोट्या रोपांना पुष्कळ फुले लागलेली असणे

गोव्यात अन्यत्र वादळामुळे पुष्कळ ठिकाणची झाडे मोडून पडलेली दिसणे; मात्र सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील वातावरण एकदम स्थिर असून तेथील छोट्या रोपांना पुष्कळ फुले लागलेली असणे आणि ते पाहून भगवंताप्रती कृतज्ञता वाटणे

अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर

‘१६.५.२०२१ या दिवशी गोव्यामध्ये वादळ आले होते. वादळामुळे पुष्कळ ठिकाणची झाडे मोडून पडली होती. लहान झाडे तर वार्‍यामुळे पडून ती उडून दूरवर गेली होती. दुसर्‍या दिवशी आम्ही घरून आश्रमात येत असतांना पाहिले की, वादळामुळे सर्वत्रच्या झाडांची स्थिती अतिशय दयनीय झाली होती; परंतु सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आल्यावर पाहिले, तर येथील वातावरण एकदम स्थिर होते. ‘जणू वादळ इथपर्यंत पोचलेच नाही’, असे वाटत होते. आश्रमातील छोट्या रोपांना पुष्कळ फुले लागली होती. हे पाहून माझ्या मनात पुढील विचार आला, ‘पावसामुळे अन्यत्र विदारक स्थिती असतांना आश्रमातील मात्र इवल्याशा रोपाच्या नाजूक फुलांची भगवंताने इतकी काळजी घेतली, मग भगवंत साधकांची किती काळजी घेत असणार ?’, या विचाराने मला भगवंताप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘या आपत्काळात माझी श्रद्धा आणि भक्ती न्यून पडत असतांना गुरुमाऊलीनेच हा प्रसंग मला दाखवून दिला’, याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक