कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्यात कोल्हापूर अग्रस्थानी ! – राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर, ३० जून – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशामध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्रात जिल्हानिहाय लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रस्थानी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत १३ लाख ३० सहस्र नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

१. ४५ वर्षांवरील ८ लाख ८२ हजार २४५ नागरिकांना पहिला डोस, तर २ लाख १५ सहस्र ६२० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

२. कोल्हापूर जिल्ह्याच्या लसीकरणाला वेग देतांनाच लस वाया जाणार नाही याचीही दक्षता यंत्रणेकडून घेतली जात आहे. ३० जूनच्या ‘कोविन पोर्टल’वरील अहवालानुसार कोल्हापूर जिल्ह्यात लस वाया जाण्याचे प्रमाण उणे ०.७३ इतके अल्प असल्याचे निदर्शनास आले आहे.