छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कृतीत आणायचे असतील, तर या देशाला हिंदु राष्ट्र करण्याविना पर्याय नाही ! – सुरेश चव्हाणके, ‘सुदर्शन न्यूज’
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘शिवराज्याभिषेक दिन : हिंदु राष्ट्र संकल्प-दिन’ या विषयावर विशेष चर्चासत्र
पुणे – आजही छत्रपती शिवाजी महाराज मनाने आणि विचारांनी आपल्यामध्ये जिवंत आहेत. महाराज असतांना कपाळावर टिळा लावण्यासह अन्य धर्माचरणाच्या कृती करणे शक्य होते. आम्ही त्यांच्या विचारांनुसार कार्य करणारे आहोत म्हणून आज टिळा लावणे शक्य होत आहे. काही वर्षांपूर्वी एक हिंदु धर्मांतर करून मुसलमान बनला. त्याने नोएडामध्ये (उत्तरप्रदेश) १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान बनवले. आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर त्यांनी त्याला कडेलोट करण्याची शिक्षा दिली असती किंवा हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडून टाकले असते; पण आज आपण लोकशाहीत ते करू शकत नाही. आज अल्पसंख्यांकांना संरक्षण मिळत आहे.
आज महाराष्ट्र वगळता देशभरातील एकाही राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास शिकवला जात नाही. राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारची ‘राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन प्रशिक्षण संस्था’ म्हणजे एन्.सी.ई.आर्.टी. अर्ध्या पानापेक्षा अधिक इतिहास शिकवत नाही. सध्या देशात शिवछत्रपतींचे विचार संपवण्याचे कारस्थान चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कृतीत आणायचे असतील, तर या देशाला हिंदु राष्ट्र करण्याविना पर्याय नाही, असे प्रतिपादन ‘सुदर्शन’ वाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शिवराज्याभिषेकदिन : हिंदु राष्ट्र संकल्प-दिन’, या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त ते बोलत होते. या कार्यक्रमात विश्व हिंदु परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारी सदस्य श्री. विवेक सिन्नरकर आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. चैतन्य तागडे आणि सौ. नयना भगत यांनी केले. हा कार्यक्रम हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ, यू ट्यूब आणि ट्विटर यांद्वारे ३ सहस्र ५०० हून अधिक जणांनी पाहिला.
भारत हिंदु राष्ट्र घोषित होण्यासाठी हिंदूंना संघर्ष आणि संघर्षच करावा लागेल ! – श्री. सुरेश चव्हाणके
१. देशाची प्रशासकीय व्यवस्था ‘छत्रपती शिवराय हे आदर्श हिंदु राजे होते’, हे देशातील तरुणांना शिकवू देत नाही. भारतियांच्या मनात आणि रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार राहू नयेत, तसेच वीरवृत्ती राहू नये, यासाठी हे सर्व अडथळे निर्माण होत आहेत. आज देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेण्यापूर्वी जशी स्थिती होती, तशी स्थिती आहे. केवळ शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने ‘हिंदु साम्राज्यदिन’ साजरा करून उपयोग नाही. छत्रपती शिवरायांचा काशी-मथुरा मुक्त करण्याचा संकल्प होता. तो आपण पूर्णत्वास नेला पाहिजे. भारत हिंदु राष्ट्र होते, आहे आणि रहाणार. यासाठी आपल्याला (हिंदूंना) संघर्ष आणि संघर्षच करावा लागेल, वेळप्रसंगी प्राणाची आहुती द्यावी लागली, तर ती आपण सिद्ध रहायला हवे.
२. आज गोरक्षणाची भाषा करणारे गुन्हेगार आणि १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान बनवणारे आदर्श ठरतात; म्हणून आपण त्यांना शिक्षा देऊ शकत नाही; पण हे छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यातील गुन्हेगार आहेत. त्यासाठी छत्रपतींचे केवळ दिन साजरे करून काहीही होणार नाही. त्यांनी स्थापन केलेल्या मापदंडानुसार अनुकरण केले पाहिजे.
हिंदू एका ध्येयाने संघटित झाले, तर भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होऊ शकतो ! – विवेक सिन्नरकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारी सदस्य, विश्व हिंदु परिषद
१. ४५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी कुणाला विचारायला गेले नव्हते. त्यांनी मूठभर मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. नंतर स्वत:चे सैन्य, शस्त्रागार, आरमार, हिंदूंची पाडलेली मंदिरे आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यांनी गोमाता आणि प्रजेचे रक्षण करणे, मंदिरांच्या मशिदी झाल्या होत्या, त्यांना पुन्हा मंदिरांमध्ये परावर्तित करणे असे कार्य केले. तो आदर्श हिंदूंनी घ्यायला हवा. आजही आपण या एका ध्येयाने संघटित झालो, तर या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करू शकतो. हे करण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही.
२. भारताला हिंदु राष्ट्र घोेषित करण्यासाठी आपली गुलामी मानसिकता सोडून द्यायला हवी. हिंदू अजूनही मानसिक गुलामगिरीतून बाहेर आलेला नाही किंवा त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडायचे नाही.
३. भारताचे तुकडे होऊन धर्माच्या आधारावर पाक निर्माण झाला. ब्रिटिशांनी भारत-पाकला लढत ठेवले. ही नीती नेत्यांनी डोळे झाकून स्वीकारत मान्य केली.
४. गेल्या ७४ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हिंदु-मुसलमान यांच्यात स्वत:ची मतपेढी सिद्ध केली; म्हणून आजही ते समान नागरी कायद्याला विरोध करतात. आम्ही हिंदू आता संघटित होऊ लागलो आहोत. या एकीतूनच आपण ध्येय गाठू शकतो.
परकीय गुलामगिरीचे कायदे, शिक्षणपद्धती आणि त्यांची प्रतिके यांमुळे आपण अजूनही स्वतंत्र नाही ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
१. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची घटना ही सुवर्णमय ऐतिहासिक आहे. त्याआधी भारतावर ५ इस्लामी आक्रमकांची सत्ता होती. त्या सत्तांना संपवण्यासाठी छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना केली. त्यांनी राज्यसंस्थापनेला धर्मसंस्थापनेचे स्वरूप दिले. याउलट वर्ष १९४७ मध्ये आपणास स्वातंत्र्य मिळाले; पण ‘राज्यसंस्थापना झाली नाही’, असे म्हणावेसे वाटते; कारण ब्रिटिशांनी क्रांतीकारकांना दडपण्यासाठी आणलेला वर्ष १८६० चा ‘इंडियन पिनल कोड’ अद्याप लागू आहे. भारतावर कायमस्वरूपी राज्य करण्यासाठी आणलेला ‘इंडियन गव्हर्नन्स ॲक्ट १९३५’ हा राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच अंतर्भूत केला आहे. ‘गुरुकुल परंपरा’ बंद पाडण्यासाठी कायदा करून चालू केलेली मेकॉलेची शिक्षणपद्धती अद्याप चालू आहे. तीच शिक्षणपद्धत आपण गेली ७४ वर्षे वापरत आहोत. अरबी, इंग्रजी आक्रमकांनी आपल्या रस्ते, वास्तू यांना दिलेली नावे आपण पालटलेली नाहीत. थोडक्यात असेच म्हणावे लागते की, आपण स्वतंत्र झालेलोच नाही.
२. छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य स्थापन होताच समस्या काही प्रमाणात दूर झाल्या; पण त्यांच्यासमोरील आव्हाने आताही आहेत.
३. हिंदवी स्वराज्याची स्थापना हिंदुद्वेषाला रोखण्यास सक्षम होती; पण दुर्दैवाने वर्ष १९४७ नंतर छत्रपतींचे स्वराज्य भारतात स्थापन होऊ शकले नाही. म्हणूनच ज्या देशात पूर्वी गोमातेचे पूजन व्हायचे, तो देश आज गोमांस निर्यातीत प्रथम स्थानी आहे. छत्रपतींनी शत्रूसंहाराचे तत्त्व आत्मसात् केले होते. त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी गोमातेची हत्या करणार्या कसायाचे हात छाटले होते. त्यांनी ती तलवार कधीच म्यान केली नाही.
४. लोकशाही तत्त्वामुळे शत्रूसंहाराचे धोरण आपण विसरलो आहोत. म्हणून आपण चीन समवेतच्या युद्धात हरलो आणि पाकसमवेत ५ वेळा युद्धे केली, तरीही अजून पाक सीमेवर कुरापती काढत असतो. म्हणून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतर अंतर्गत कलह, बाह्य समस्या आपोआपच दूर होतील.
५. भव्यदिव्य कार्य हे आत्मबळानेच निर्माण होते. ते साधनेने आणि आध्यात्मिक मार्गानेच वाढते. छत्रपती शिवाजी महाराज सतत ‘जगदंब’, असा नामजप करत होते. त्यांना साक्षात् भवानीमातेचे दर्शन झाले होते आणि त्यांना हिंदवी स्वराज्यासाठी भवानीमातेने तलवार दिली होती, हे विशेष आहे.
६. इतिहासकार यदुनाथ सरकार यांना औरंगजेबाचा इतिहास लिहितांना छत्रपती शिवाजी महाराज समजले. ते शिवरायांविषयी लिहितात की, हिंदु धर्म हा अमर आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्ध केले आहे. ज्या धर्मात छत्रपतींसारखे शूर योद्धे जन्माला येतात, तो धर्म कितीही संकटे आली, तरी कधीच नष्ट होणार नाही.
आपण सारेच शिवरायांचे वंशज असल्याने हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे दायित्व आपल्या सर्वांचे आहे. हिंदु राष्ट्र मागितल्याविना मिळणार नाही. त्यासाठी तीच प्रमुख मागणी सातत्याने करावी लागेल.
दर्शकांचे अभिप्राय
१. श्री. किरण – मी आठवड्यातील एक दिवस हिंदु राष्ट्रासाठी देईन.
२. श्री. उल्हास मखी – छत्रपती शिवाजी महाराज हे ‘कलम’ (लेखणी) घेऊन लिहीत न बसता, तलवारीने ‘सर कलम’ (शीर धडा वेगळे करणे) करत होते, म्हणून स्वराज्य मिळाले.
३. स्नेहल जेवळे – प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज येण्यासाठी, प्रत्येक आईने जिजाऊ बनले पाहिजे. भगिनींनो, आपण सर्व सिद्ध आहात ना ?