मानाच्या पालख्यांसमवेत अन्य दिंड्यांना सहभागी करून घेण्याची वारकर्यांची मागणी अमान्य !
पुणे – कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता असल्याने आषाढी वारीमध्ये मानाच्या पालख्यांसमवेत अन्य दिंड्यांना सहभागी करून घेण्याची वारकर्यांची मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी अमान्य केली आहे. राज्य सरकारने निश्चित केलेल्या नियमानुसार मानाच्या १० पालख्या बसमधून पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदी आणि देहू या ठिकाणी प्रत्येकी १०० जणांना, तर अन्य ठिकाणी प्रत्येकी ५० वारकर्यांना उपस्थित रहाता येणार आहे. पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून वाखरी येथून दीड किलोमीटरपर्यंत पोलीस बंदोबस्तात पायी वारी जाणार आहे. अन्य ठिकाणाहून आलेल्या १० पालख्याही वाखरी येथे एकत्र येणार आहेत. त्यामुळे या काळात वाखरी परिसरात १४४ कलम लागू असेल.