भारतात हिंदूंचे सर्वाधिक धर्मांतर ! – ‘प्यू रिसर्च सेंटर’चे सर्वेक्षण
|
|
वॉशिंग्टन (अमेरिका) – येथील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने प्रसिद्ध केलेल्या भारतातील विविध धर्मियांच्या संदर्भातील एका सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये भारतामध्ये सर्वाधिक धर्मांतर हिंदूंचे झाले आहे, असे म्हटले आहे. त्यातही हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची टक्केवारी सर्वाधिक आहे. यातील ७४ टक्के धर्मांतरित हिंदू एकट्या दक्षिण भारतातील राज्यांमधील आहेत. यामुळेच दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ख्रिस्त्यांच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. धर्मांतर करणार्यांमधील जवळपास अर्धे लोक हे अनुसूचित जातींमधील आहेत, तर १४ टक्के अनुसूचित जमाती आणि २६ टक्के ओबीसी (अन्य मागासवर्गीय जाती) यांमधील आहेत. धर्मांतर करणार्यांपैकी ४५ टक्के लोकांनी विशेषतः अनुसूचित जातींसमवेत केला जाणारा भेदभाव याला कारण असल्याचे म्हटले आहे.
Chart: Among Hindus, large regional divides on views of national identity politics. https://t.co/9z5LvJua3Y pic.twitter.com/1Gr9mXcOUy
— Pew Research Center (@pewresearch) June 30, 2021
हिंदु तरुणींनी अन्य धर्मांमध्ये विवाह करणे अयोग्य ! – सर्वेक्षणात हिंदूंनी व्यक्त केलेले मत !
भारतातील हिंदूंना त्यांच्या मुलींनी अन्य धर्मांमध्ये विवाह करणे अयोग्य आहे, असे म्हटल्याचे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. ६७ टक्के हिंदूंनी सांगितले, ‘त्यांच्या मुलींनी अन्य धर्मांमध्ये विवाह करणे योग्य नाही.’ ‘पुरुषांनीही अन्य धर्मीय तरुणीशी विवाह करू नये’, असे ६५ टक्के हिंदूंना वाटते. या संदर्भात ८० टक्के मुसलमानांनी ‘त्यांच्या तरुणींनी अन्य धर्मियांशी विवाह करू नये’, तर ७६ टक्के मुसलमानांनी ‘त्यांच्या पुरुषांनी अन्य धर्मियांशी विवाह करू नये’, असे सांगितले.
A survey from Pew Research Center found that 80% of the Muslims who were interviewed felt it was important to stop people from their community from marrying into another religion. Around 65% of Hindus felt the samehttps://t.co/9oe1ilS3ps
— BBC News India (@BBCIndia) June 30, 2021
गोमांस खाणारा आणि मंदिरात न जाणारा हिंदू असू शकत नाही !
६४ टक्के हिंदूंनी सांगितले की, खरा भारतीय होण्यासाठी हिंदू असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातही ८० टक्के हिंदूंनी म्हटले की, यासाठी हिंदी भाषा येणे आवश्यक आहे. उत्तर भारतात ६९ टक्के, मध्य भारतात ८३ टक्के आणि दक्षिण भारतात ४२ टक्के हिंदूंनी स्वतःची ओळख राष्ट्रवादाशी जोडली. ७२ टक्के हिंदूंनी म्हटले की, गोमांस खाणारा ‘हिंदू’ असू शकत नाही. तसेच ‘देवावर विश्वास न ठेवणारा हिंदू असू शकत नाही’, असे ४९ टक्के लोकांनी, तर ‘मंदिरात न जाणारा हिंदू असू शकत नाही’, असे ४८ टक्के हिंदूंनी सांगितले.
Nearly three-quarters of Hindus (72%) in India say a person cannot be Hindu if they eat beef. That is larger than the shares of Hindus who say a person cannot be Hindu if they do not believe in God (49%) or never go to a temple (48%). https://t.co/Si7DC45nwQ pic.twitter.com/qE5jWEYchy
— Pew Research Center (@pewresearch) June 29, 2021
‘प्यू रिसर्च सेंटर’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालातील काही महत्त्वाची सूत्रे
१. वर्ष २०१९-२० मध्ये देशातील २६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांतील १७ भाषा बोलणार्या लोकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला. त्याद्वारे राष्ट्रवाद, धार्मिक श्रद्धा आणि सहिष्णुता यांविषयी अभ्यास करण्यात आला. त्यात भारतातील लोक धार्मिक रूपामध्ये सहिष्णु आहेत आणि ते त्यांच्या धर्मानुसार स्वतंत्रपणे जीवन जगणे पसंत करतात, असे लक्षात आले.
२. या सर्वेक्षणात ८४ टक्के लोकांनी स्वतः खरे भारतीय असल्याचे सांगत सर्व धर्मांचा सन्मान करत असल्याचे सांगितले. तसेच ७८ टक्के मुसलमानांनी असे सांगितले. (एवढ्या मोठ्या संख्येने मुसलमान सर्व धर्मांचा सन्मान करतात, असे दिसून का येत नाही ? – संपादक)
३. मित्र म्हणून प्रत्येक धर्मीय स्वतःच्या धर्मातील व्यक्तीलाच प्राधान्य देतात.
४. ७४ टक्के मुसलमानांनी म्हटले की, मुसलमानांनी त्यांच्या धर्माच्या शरीयत न्यायालयातच जायला हवे. भारतात वर्ष १९३७ पासून मुसलमानांच्या धार्मिक प्रकरणांचा निवाडा करण्यासाठी शरीयत न्यायालयाची व्यवस्था आहे. या अंतर्गत काजी निर्णय देत असतात. कायद्याच्या दृष्टीने या न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे पालन करण्यास बाध्य करता येत नाही. (शरीयत न्यायालये रोखण्यासाठी देशात समान नागरी कायदाच हवा ! – संपादक)
५. ४८ टक्के मुसलमानांनी म्हटले की, वर्ष १९४७ मध्ये झालेली भारताची फाळणी हिंदु आणि मुसलमान यांच्या संबंधांवर वाईट परिणाम करणारी ठरली. दुसरीकडे केवळ ३७ टक्के हिंदूंनी आणि ६६ टक्के शिखांनी याला दुजोरा दिला.
६. ९७ टक्के भारतीय नागरिक ईश्वरावर श्रद्धा ठेवतात, तर त्यातील ८० टक्क्यांचे म्हणणे आहे, ‘ईश्वराचे अस्तित्व आहे.’ ७७ टक्के मुसलमान आणि ५४ ख्रिस्ती यांनी म्हटले, ‘ते कर्म सिद्धांतावर विश्वास ठेवतात.’ ७ टक्के हिंदू ईद आणि १८ टक्के हिंदू नाताळ साजरा करतात. (किती टक्के मुसलमान आणि ख्रिस्ती हिंदूंचे सण साजरे करतात, याचे सर्वेक्षण प्यू रिसर्च सेंटरने का केले नाही कि त्याची आकडेवारी नगण्य असल्याने ती दडपून ठेवण्यात आली ? – संपादक)