तेलंगाणा राज्यातील प्रत्येक दलित कुटुंबातील एका सदस्याला शासन देणार १० लाख रुपये !
|
भाग्यनगर (तेलंगाणा) – राज्यातील प्रत्येक दलित कुटुंबातील एका व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये राज्यशासनाकडून १० लाख रुपये जमा केले जातील, अशी घोषणा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे. या योजनेसाठी सध्या १ सहस्र २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचे नाव ‘मुख्यमंत्री दलित अधिकारिता कार्यक्रम’ असे असणार आहे. राज्यातील दलितांची आर्थिक स्थिती भक्कम करून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात ११ सहस्र ९०० कुटुंबांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील १०० कुटुंबांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. तेलंगाणात विधानसभेचे ११९ मतदारसंघ आहेत.
According to the Telangana Chief Minister’s office, in the first phase, the assistance would be given to 100 families selected from each of the 119 Assembly Constituencieshttps://t.co/AkXkQwqtFF
— India TV (@indiatvnews) June 28, 2021