तालिबानी आतंकवाद्यांवर पाकमधील रुग्णालयांत उपचार होतात ! – पाकच्या मंत्र्याची स्वीकृती
पाक तालिबान्यांना साहाय्य करतो, हे यातून आता अधिकृतरित्या उघड झाले आहे. आता जगाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – तालिबानी आतंकवाद्यांची कुटुंबे इस्लामाबादमध्येच रहातात, तसेच तालिबानी आतंकवाद्यांवर पाकिस्तानी रुग्णालयांत उपचारही केले जातात, अशी स्वीकृती पाकचे मंत्री शेख रशिद अहमद यांनी दिली आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पाक तालिबानला साहाय्य करतो, हा आरोप पाककडून नेहमीच फेटाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर शेख रशिद यांनी दिलेली स्वीकृती पाकचा चेहरा उघड करत आहे.
Do #Talibans live in Pakistan? Minister answershttps://t.co/ZP50mfJ8qR pic.twitter.com/i097AizuG7
— Hindustan Times (@htTweets) June 29, 2021
१. शेख रशिद अहमद यांनी म्हटले आहे, ‘तालिबानी आतंकवाद्यांची कुटुंबे रवात, लोई बेर, बारा काहू आणि तरनोल या भागांमध्ये रहातात.’ हे भाग प्रसिद्ध आणि उच्चभ्रू समजले जातात.
२. यापूर्वी इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गाझा पट्टीतील हमासच्या आतंकवाद्यांना पाकिस्तान सैन्याकडून प्रशिक्षण दिले जात असल्याचा मोठा दावा पाकिस्तानचे खासदार राजा जफर उल् हक यांनी केला होता.