‘हळदीघाटातील युद्ध भाग – १’ या पुस्तकाचे अनावरण !
पुणे – ४८४ वर्षांपूर्वी १८ जून या दिवशी हळदीघाटातील युद्ध झाले. त्याचे औचित्य साधून १८ जून २०२१ या दिवशी इतिहासकार डॉ. पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते ‘हळदीघाटातील युद्ध भाग – १’ या मराठी ई पुस्तकाचे, लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंह यांच्या हस्ते हिंदीमधील ई-पुस्तकाचे, तर ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते इंग्रजी ई-पुस्तकाचे अनावरण झाले.