जम्मूमधील सैन्यदलाच्या तळावर ड्रोन्सद्वारे आक्रमणाचा प्रयत्न सैनिकांनी उधळला !
|
जम्मू – जिहादी आतंकवाद्यांनी येथील वायूदलाच्या तळावर ड्रोनद्वारे बॉम्बस्फोट केल्यानंतर अवघ्या २४ घंट्यांत आतंकवाद्यांनी जम्मूच्याच कालूचक येथील सैन्यदलाच्या तळावर ड्रोनद्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सतर्क असणार्या येथील सैनिकांनी मात्र ड्रोनवर गोळीबार केल्यावर दोन्ही ड्रोन दिसेनासे झाले. २७ जूनच्या उत्तररात्री ३ च्या सुमारास २ ड्रोन तळाजवळ घिरट्या घालत असतांना सैनिकांना ते दिसल्यावर त्यांनी त्वरित गोळीबार चालू केला. सध्या सैन्याकडून या ड्रोन्सचा शोध घेण्यात येत आहे.
Two more drones were spotted hovering over Kaluchak and Ratnuchak military stations, a day after a drone attack on Indian Air Force’s (IAF) technical airport in Jammu.@JodieCohen613 brings you the details pic.twitter.com/8QxgliRhVe
— WION (@WIONews) June 28, 2021