जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन यांतील एकूण १८ जणांना कोरोनाची लागण
सिंधुदुर्ग – एकीकडे कोरोना संक्रमण वाढत असताना दुसरीकडे कोरोना विरोधातील लढ्यात महत्वाचा भाग असणारी प्रशासकीय यंत्रणा कोरोनाबाधित होऊ लागली आहे. देवगड तालुका आरोग्य अधिकार्यांसह ७ कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.
मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सांगितले की, ‘मी कोरोना प्रतिबंधक लसीच्या २ मात्रा (डोस) घेतले आहेत. त्यामुळे त्रास कमी होत आहे. लवकरच बरा होऊन कोरोना विरोधी लढ्यात पुन्हा सहभागी होईन.’
कुडाळ पोलीस ठाण्यातील १० पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. यातील काही कर्मचार्यांची कुटुंबेही कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. प्रशासकीय यंत्रणेत कोरोनाने शिरकाव केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.