यवतमाळ येथील साप्ताहिक ‘स्वराज्य गर्जना’चे क्रांतीकुमार अलोने यांची योगासनामध्ये विश्वविक्रमाची नोंद !
यवतमाळ, २७ जून (वार्ता.) – आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने २१ जूनला ‘अखिल भारतीय योग महासंघा’ने जागतिक स्तरावर ‘ग्रुप इव्हेंट’ आयोजित केले होते. त्यात साप्ताहिक ‘स्वराज्य गर्जना’चे संपादक क्रांतीकुमार शैलेश अलोने यांनी चक्रासनामध्ये २ मिनिटे आणि उष्ट्रासनामध्ये ४ मिनिटे राहून आपले नाव ‘वर्ल्ड बुक ऑफ योगा रेकॉर्ड’मध्ये नोंदवले. यशाचे श्रेय त्यांनी वडील शैलेश अलोने, आई सौ. सुवर्णा अलोने, बहीण ज्वाला अलोने यांना दिले. त्यांना ‘श्री. नंदानु योगकेंद्र यवतमाळ’चे संचालक श्री. प्रेमदास पकडे यांचे मार्गदर्शन लाभले. क्रांतीकुमार हे इंदिरा महाविद्यालय, कळंब येथे विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहेत.