एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले यांच्याकडून क्रोएशिया येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. व्लादिमिर चिरकोव्हिच यांना शिकायला मिळालेली सूत्रे
२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रो पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.
२६ जून २०२१ या दिवशी आपण या लेखात ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे सद्गुरु सिरियाक वाले यांनी परिस्थिती प्रतिकूल असूनही साधनेत सातत्य, तत्परता आणि गुरुसेवेची तळमळ टिकवून वेगाने आध्यात्मिक प्रगती कशी केली? याविषयी सूत्रे पाहिली. आज सद्गुरु सिरियाक वाले यांच्याकडून श्री. व्लादिमिर चिरकोव्हिच यांना शिकायला मिळालेली उर्वरित सूत्रे पाहूया.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/490034.html |
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये सनातन आणि एस्.एस्.आर्.एफ्. यांच्या संतांच्या संदर्भात येत असलेल्या लेखांमुळे ‘पुढे मी नसेन, तेव्हा साधकांना मार्गदर्शन कोण करणार ?’, ही माझी काळजी पूर्णपणे दूर होऊन मी निश्चिंत झालो !‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये सनातन आणि एस्.एस्.आर्.एफ्.च्या अनेक संतांच्या संदर्भात साधकांनी लिहिलेले लेख काही वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांत संत आणि साधक यांनी लिहिलेली संतांची गुणवैशिष्ट्ये, शिकवण, त्यांच्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती इत्यादी विषय वाचून ‘पुढे मी नसेन तेव्हा साधकांना मार्गदर्शन कोण करणार ?’, ही माझी काळजी पूर्णपणे दूर झाली आहे. उलट मला वाटले, ‘मी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कुठेच जाऊन साधकांना भेटू शकत नाही. याउलट सनातनचे संत साधकांना नियमितपणे भेटतात. या भेटींमुळे साधकांची प्रगती जलद होत आहे, तसेच संस्थेचे कार्यही झपाट्याने वाढत आहे.’ यामुळे मला आनंद झाला ! या आपत्काळातही सनातनच्या साधकांना संतांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे साधनेत लाभ होत आहे. सनातनची शिकवण अशीच पुढे वृद्धींगत होऊन साधक साधनेत पुढे पुढे जाणार आहेत आणि हिंदु राष्ट्राची धुरा सांभाळणार आहेत. त्यामुळे मला काळजी वाटत नाही. यासाठी मी माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या आणि देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले यांचा परिचयसद्गुरु सिरियाक वाले फ्रान्स येथील असून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मॉडेलिंग’ करत होते. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष १९९९ मध्ये त्यांनी साधना करण्यास आरंभ केला. वर्ष २००९ पासून ते पूर्णवेळ साधना करू लागले. मार्च २०१३ मध्ये त्यांनी संतपद प्राप्त केले आणि ऑगस्ट २०१८ मध्ये ते सद्गुरुपदी विराजमान झाले. वर्ष २०१२ पासून ते एस्.एस्.आर्.एफ्.च्या अंतर्गत होत असलेल्या कार्याचे, उदा. सत्संग, कार्यशाळा, प्रवचने यांद्वारे होणार्या अध्यात्मप्रचाराचे दायित्व पाहू लागले. त्यांच्यात मानवाच्या आध्यात्मिक प्रगतीची तीव्र तळमळ आहे. जगात ‘कोरोना विषाणू’मुळे महामारी चालू असतांनाही त्यांनी मार्च २०२० पासून ‘कॅराव्हॅन’मध्ये (सर्व सुविधा असलेल्या मोठ्या वाहनामध्ये) वास्तव्य करून जर्मनी येथून ‘ऑनलाईन’ प्रवचने घेतली. दळणवळण बंदीच्या या काळात बंदीच्या संदर्भातील सर्व नियम पाळून त्यांनी ‘कॅराव्हॅन’मधून प्रवास करत युरोपमध्ये अध्यात्मप्रसाराचे कार्यही केले. साधक आणि जिज्ञासू यांना मार्गदर्शन करणे, तसेच विविध ठिकाणी प्रवचने घेणे, यांची एकही संधी त्यांनी सोडली नाही. त्यांच्यातील या तळमळीमुळेच ‘कोरोना’ महामारीच्या काळातही अध्यात्माचा प्रचार करणार्या जगातील काही मोजक्या आध्यात्मिक मार्गदर्शकांपैकी ते एक ‘मार्गदर्शक’ ठरले आहेत. |
‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेने दाओस (क्रोएशिया) येथे एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने २ कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी जवळजवळ ३ आठवडे मला सद्गुरु सिरियाकदादांच्या समवेत रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्याकडून मला बरीच सूत्रे शिकायला मिळाली. ती पुढे दिली आहेत.
६. सद्गुरु सिरियाकदादा यांची देहबुद्धी अल्प असल्यामुळे शारीरिक व्याधींचा दिखावा न करणे आणि स्वतःला वेदना होत असतांनाही इतरांना आध्यात्मिक साहाय्य करणे
सद्गुरु सिरियाकदादा त्यांच्या शारीरिक त्रासांचा किंवा वेदनांचा दिखाऊपणा न करता सेवा करतात. त्यांच्यात देहबुद्धी अल्प आहे. एकदा त्यांना वेदनेमुळे २० ते ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी बसणे कठीण जात होते, तरीही त्यांच्या मुखावर वेदनांचा लवलेशही नव्हता. पुढील उदाहरणांवरून ते लक्षात येईल.
आ. एकदा रात्री उशिरा सद्गुरु सिरियाकदादांच्या कमरेला वेदना होत असतांना मी त्यांना तेलाने मर्दन करत होतो. त्या वेळीसुद्धा विदेशातील एका साधिकेला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत असल्याने त्यांनी त्या साधिकेसाठी नामजपादी उपाय केले.
इ. बर्याच प्रसंगांत असे लक्षात आले आहे की, ज्या ज्या वेळी एखाद्या साधकाला साहाय्याची आवश्यकता असते, त्या त्या वेळी सद्गुरु सिरियाकदादा स्वतःला कितीही वेदना होत असल्या, तरी साहाय्यासाठी तेथे असतात. ‘माझ्या साहाय्याची आवश्यकता भासल्यास मला रात्री अपरात्री कधीही उठवा’, असे ते आम्हाला सांगतात. ‘संत परोपकारी असून ते स्वतःच्या शारीरिक त्रासांकडे दुर्लक्ष करतात’, या उक्तीची मला आठवण झाली. यावरून मला माझ्या आध्यात्मिक प्रवासासाठी प्रेरणा आणि योग्य दिशा मिळाली.
७. परात्पर गुरु डॉक्टरांवर संपूर्ण श्रद्धा असणे
सद्गुरु सिरियाकदादांकडून साधनेविषयी मार्गदर्शन घेत असतांना ते मला सांगतात, ‘‘आपण काय करू शकतो ? आपण खरंच काही करू शकत नाही किंवा कुणालाही पालटू शकत नाही. केवळ परात्पर गुरु डॉक्टरच सर्वकाही करू शकतात. परात्पर गुरु डॉक्टर सर्वकाही जाणतात. त्यामुळे अपेक्षा न करता साधकांच्या हितासाठी योग्य ते सांगून शेष परात्पर गुरु डॉक्टरांवर सोपवावे.’’
८. ‘अहं’चे प्रमाण अल्प आणि शिष्यभाव असल्यामुळे साधकांमध्ये सहजतेने मिसळणे
सद्गुरु सिरियाकदादांच्या स्वभावात पारदर्शकता आणि मनमोकळेपणा आहे. ते सर्व साधकांना साधनेतील त्यांचे अनुभव मनमोकळेपणाने सांगतात आणि साधकांमध्ये सहजतेने मिसळतात. त्यांच्या या स्वभावामुळे दिवसा किंवा रात्री कधीही आपण त्यांच्याकडे विश्वासाने जाऊ शकतो. त्यांचे वागणे एखाद्या साधकाप्रमाणेच असल्याने ‘ते संत नसून साधारण व्यक्ती आहेत’, असे एखाद्याला स्थुलातून वाटेल; कारण ते नेहमी शिष्यभावात असतात. त्यांच्यातील ‘अहं’चे प्रमाण अत्यल्प आहे आणि हीच त्यांची महानता आहे.
९. चुकांमुळे सेवा आणि साधना यांत हानी होऊ नये यांसाठी साधकांना तत्परतेने चुकांची जाणीव करून देणे; मात्र काही वेळा साधकाची मानसिक स्थिती हेरून योग्य वेळेची वाट पहाणे
साधकांच्या सेवेतील त्रुटी किंवा चुका सद्गुरु सिरियाकदादांच्या लक्षात आल्यावर ते मला सांगतात, ‘‘संबंधित साधकाला चुकांची जाणीव करून दे.’’ त्या वेळी मी थोड्या संकोचाने त्यांना सांगायचो, ‘‘मी योग्य वेळ पाहून त्यांना सांगतो.’’ त्यावर ते मला म्हणायचे, ‘‘नको. आताच जाऊन सांग.’’ यातून मला माझ्यातील ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषाची जाणीव होत असे. तसेच सद्गुरु दादा साधकांच्या साधनेचा किती विचार करतात, म्हणजे ‘साधकांचा एकही क्षण वाया जायला नको, साधकांना लवकरात लवकर त्यांच्याकडून होणार्या चुका सुधारण्याची संधी मिळावी, जेणेकरून त्यांच्या सेवेत, साधनेत हानी होणार नाही’, हे शिकायला मिळाले. कधी कधी मात्र ते मला साधकाच्या स्थितीनुसार योग्य वेळेची वाट पहाण्यासही सांगत असत. साधकांकडून झालेल्या चुकांचा होणारा परिणाम, साधकाची मानसिक स्थिती, त्याच्या साधनेची स्थिती, परिस्थिती इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांना चुका त्वरित कधी सांगायच्या आणि कधी वाट पहायची, हे सद्गुरु दादा बरोबर जाणतात.
१०. सूक्ष्म स्तरावर चैतन्य कार्यरत झाल्याने अंतर्मुख होणे आणि परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवून अल्प शब्दांत शंकानिरसन करता येणे
शिबिराच्या वेळी साधकांनी प्रश्न विचारल्यास सद्गुरु सिरियाकदादा काही क्षण शांत रहातात आणि मग उत्तर देतात. याउलट माझा असा विचार असतो की, ‘काहीतरी बोलून संभाषण चालू रहायला पाहिजे.’ मी याविषयी आत्मनिरीक्षण केल्यावर मला माझ्यातील ‘बहिर्मुखता’ आणि ‘कर्तेपणा असणे’ या स्वभावदोषांची जाणीव झाली. त्यानंतर मी सद्गुरु दादांचे अधिक निरीक्षण करू लागलो. त्या वेळी ‘विचारलेला प्रश्न आणि उत्तर देणे यांमध्ये निर्माण झालेल्या वेळेच्या पोकळीत सूक्ष्मस्तरावर सर्वांसाठी हितकर गोष्टी घडू शकतात. म्हणजे प्रथम सूक्ष्म स्तरावर (शब्दातीत) शिबिर झाल्यानंतर ते स्थुलातून (शब्दप्रमाणात) होत असावे’, असे मला जाणवले. सद्गुरु सिरियाकदादांमध्ये ‘अहं’चे प्रमाण अल्प असल्यामुळे ईश्वरच त्यांच्या माध्यमातून उत्तर देतो, यात शंका नाही. त्या अवधीत साधकांना आत्मपरीक्षण करण्यासही वेळ मिळतो आणि त्यामुळे चैतन्य कार्यरत होते. तसेच त्या अवधीत परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अधिक प्रमाणात अनुभवता येते. त्यामुळेच सद्गुरु दादा साधकांना मार्गदर्शन करतात, तेव्हा ते न्यूनतम शब्दांत, अधिक सखोल आणि प्रीतीमय वाणीत उत्तरे देऊन शंकांचे निरसन करतात. परिणामी साधकही अधिक अंतर्मुख होतात, त्यांना अधिक प्रमाणात चैतन्य ग्रहण करता येते आणि त्यांच्या शंकांचेही योग्य निरसन होते.
आम्ही साधक आणि सद्गुरु सिरियाकदादांच्या संपर्कात येणारे सर्वच जिज्ञासू त्यांना भेटण्यास अन् त्यांच्या उपस्थितीत रहाण्यास सदैव उत्सुक असतो. याचे कारण ते जेथे जेथे जातात, तेथे तेथे ते त्यांचा सकारात्मक प्रभाव त्यांच्या मागे सोडतात. परात्पर गुरुदेवांचे स्मरण केल्यावर जशी आमची भावजागृती होते, आनंद मिळतो, तशीच भावजागृती सद्गुरु सिरियाकदादांच्या समवेत घालवलेला प्रत्येक क्षण आठवल्यावर होते आणि आनंद मिळतो.
सद्गुरु सिरियाकदादांकडून शिकायला मिळालेली सूत्रे मी परात्पर गुरुदेवांच्या आणि त्यांच्या चरणी अर्पण करतो.’
– श्री. व्लादिमिर चिरकोव्हिच, झदार, क्रोएशिया. (९.९.२०२०)
(समाप्त)
‘कॅराव्हॅन’च्या आतील भागात घट्ट बसवलेले छायाचित्र आसंदीत पडणे, ‘आसंदीत त्या छायाचित्राचे त्रिमितीय प्रतिबिंब पडले आहे’, असे लक्षात येणे आणि त्या वेळी ‘कॅराव्हॅन’मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व असून ते सर्वत्र आहेत’, हे त्यांनी दाखवून दिल्याचे जाणवणे
‘एकदा दिवसा महामार्गावर ‘कॅराव्हॅन’ (सर्व सुविधा असलेले मोठे वाहन) चालवत असतांना ‘मागून कोणती गाडी येत नाही ना ?’, हे पहाण्यासाठी मी आरशात पाहिले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आसंदीत असल्याचे मला दिसले. ते गाडीच्या आतील भागावर घट्ट बसवले होते. ‘तेथून ते खाली पडले आहे’, असे मला वाटले; परंतु ‘घट्ट बसवलेले छायाचित्र असे कसे खाली पडले ?’, हे मला समजत नसल्याने मी गोंधळून गेलो. त्यामुळे मी पुन्हा एकदा मागे पाहिले. तेव्हा छायाचित्र आसंदीत अगदी सरळ होते. ‘ते कुणीतरी अगदी अलगद त्या आसंदीत ठेवले आहे’, असे दिसत होते. मी वर पाहिले, तर आतील भागावर घट्ट बसवलेले छायाचित्रही तिथे होते. तेव्हा लक्षात आले की, आसंदीवर त्या छायाचित्राचे प्रतिबिंब पडले आहे. प्रतिबिंब त्रीमितीय आकारात दिसत होते, इतके ते स्पष्ट होते. मी हे समजून घेण्याचा पुष्कळ प्रयत्न केला की, ‘इतका प्रकाश असतांना असे कसे शक्य आहे ? आणि ते प्रतिबिंब वरच्या छायाचित्राप्रमाणे इतके स्पष्ट कसे असू शकते ?’ २० सेकंदांनंतर ते प्रतिबिंब हळूहळू अस्पष्ट होऊन एका मिनिटांनंतर ते दिसेनासे झाले. या अनुभूतीतून भगवंताने मला ‘कॅराव्हॅन’मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व असून ते सर्वत्र आहेत’, हे दाखवून दिले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी मी कृतज्ञ आहे.’ – (सद्गुरु) सिरियाक वाले, युरोप (२३.४.२०२१) |
गुरुपौर्णिमेच्या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांना त्यांचे पती सद्गुरु सिरियाक वाले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती१. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात सद्गुरु सिरियाक वाले यांना पाहिल्यावर ‘त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरुच बोलत आहेत, तसेच त्यांच्याभोवती पांढर्या प्रकाशाचे वलय निर्माण झाले आहे’, असे जाणवणे ‘वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही गुरुपौर्णिमेचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहात होतो. सद्गुरु सिरियाक वाले (माझे यजमान) गुरुपौर्णिमेची माहिती सांगून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधकांसाठी असलेला संदेश वाचून दाखवत होते. सद्गुरु सिरियाक यांच्याकडे पाहिल्यावर मला जाणवले, ‘त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरुच बोलत आहेत, तसेच त्यांच्याभोवती पांढर्या प्रकाशाचे वलय निर्माण झाले असून तो प्रकाश तेजस्वी स्वरूपात प्रक्षेपित होत आहे.’ २. ‘सद्गुरु सिरियाक हे यजमान नसून गुरुच आहेत’, असा विचार मनात येणे, त्या वेळी सत्ययुगातील पतीला देव मानून त्याची पूजा अन् सेवा करणार्या पत्नीची आठवण येणे आणि गालावरून थंडगार अश्रू ओघळणे ‘सद्गुरु सिरियाक माझे यजमान नसून ते माझे गुरुच आहेत’, असा विचार माझ्या मनात आला. सामान्यतः माझ्या मनात असे विचार येत नाहीत. त्यामुळे मला याचे आश्चर्य वाटले. सत्ययुगात पत्नी आपल्या पतीला गुरु मानून त्यांची पूजा, तसेच सेवा करत असे. त्या काळी विवाहाकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून पाहिले जायचे. ज्याप्रमाणे लग्नात सप्तपदीच्या वेळी पत्नी पतीचा हात धरून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी त्याच्या मागून चालते, त्याचप्रमाणे हे असावे. पत्नीने पतीच्या पावलावर पाऊल टाकून त्याच्यामागे चालायचे आणि त्याला गुरु मानून त्याची पूजा करायची. हे लक्षात येताच माझ्या गालावरून थंडगार अश्रू ओघळले आणि सद्गुरु सिरियाक यांच्याकडे पहात असतांना क्षणभर मला आनंद वाटला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेल्या या सुंदर अनुभूतीविषयी कृतज्ञता ! माझी आई मला म्हणाली, ‘हा विचार मनात येणे’, ही माझ्यासाठी एक भेटच आहे; कारण मी नेहमी सद्गुरु सिरियाक यांच्याशी तुलना करते. ही अनुभूती लिहितांना माझा भाव जागृत होत होता. ‘मला इतका चांगला पती मिळाला, तसेच आम्ही एकत्र साधना करत आहोत’, याविषयी मी कृतज्ञ आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ – एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले (५.७.२०२०) |
|