महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करतांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक !
कोल्हापूर, २७ जून – महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणार्यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ अहवाल किंवा कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा दाखला असल्याविना प्रवेश दिला जाणार नाही. २६ जून या दिवशी बेळगावचे जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांनी कोगनोळी पडताळणी नाक्याला भेट देऊन पडताळणी कडक करण्याच्या सूचना केल्या. गेल्या दोन मासांपासून कोगनोळी पडताळणी नाक्यावर महसूल, आरोग्य, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी कार्यरत आहेत.