प्रत्येक पदार्थाकडे पहाण्याचा आयुर्वेदाचा विशाल दृष्टीकोन !
जगात एकही द्रव्य असे नाही की, ज्याचा औषध म्हणून उपयोग करता येणार नाही. तसे करणे, हे प्रत्येक वैद्याचे काम आहे, उदा. वाळू. उष्ण वाळूची पुरचुंडी करून सूज आलेल्या सांध्यांना शेक देता येतो.
औषध घेण्याची आयुर्वेदाने सांगितलेली योग्य पद्धत !
मनातील काम-क्रोधादी दोष काढून टाकून शांत आणि एकाग्र चित्ताने औषध घ्यावे म्हणजे ते परिणामकारक होते !