स्त्रियांचे आजार !
१. अशोकाचे गर्भाशयावर अधिक प्रभावाने कार्य होते. यामुळे गर्भाशयाची शिथिलता नाहीशी होते. गर्भाशयाचा दाह आणि शूल नाहीसा होतो आणि योनीवाटे अधिक रक्तस्राव होत असल्यास थांबतो. अशोकाचे साल तुटलेले हाड जोडण्यास मदत होते.
२. पाळीच्या वेळी ओटीपोटात होणार्या वेदना : ओव्याचे चूर्ण मुळ्याच्या रसासह घ्यावे.
३. कष्टार्तव : मासिक पाळीत वेदना होत असल्यास कायफळ ४८० मिलिग्रॅम, केशर ६० मिलिग्रॅम, तीळ ३ ग्रॅम जुन्या गुळामध्ये गोळी बनवून गरम पाण्यासमवेत रात्री घ्यावे.
४. पाळी येत नसल्यास किंवा पाळी येतांना त्रास होत असल्यास : ५०० मिलिग्रॅम ते १ ग्रॅम प्रमाणात रात्री केशर द्यावे.