मोठ्या आजारांवरील आयुर्वेदातील औषधे !
हृदयविकार
- हृदरोगावर उपयोगी वनस्पती : बला (चिकणा)
- हृदरोग, दमा, खोकला यांवर पुष्करमूळाचे चूर्ण मधासमवेत घ्यावे बकुळीच्या फुलांचा हार घालावा, तसेच बकुळीच्या सालीचा काढा प्यावा.
- अर्जुनाचे चूर्ण दुधात उकळून त्यात तूप आणि साखर घालून घ्यावे. त्यामुळे हृदयातील आग आणि धडधड थांबते.
- अर्जुन चूर्ण ५ ते १० ग्रॅम, वेलची चूर्ण २४० मिलिग्रॅम दूध पाव लिटर, पाणी पाव लिटर घेऊन पाणी आटून जाईपर्यंत उकळावे. १ वर्षभर प्रतिदिन सकाळी घ्यावे.
हृदयशूल
- मृगशृंगभस्म २४० मिलिग्रॅम तुपाबरोबर घ्यावे आणि वर अर्जुन सिद्ध दूध प्यावे.
- काश्मरी (शिवण) ही वनस्पती यावर उपयुक्त आहे.
क्षय (टी.बी.)
- क्षयातील खोकला आणि थुंकीतून रक्त येणे
- अर्जुन आणि रक्तचंदन समभाग चूर्ण घेऊन तांदुळाच्या धुवणासह घ्यावे.
- अर्जुनाच्या चूर्णाला अडुळसाच्या रसाच्या ७ भावना द्याव्या आणि नंतर तूप, मध आणि साखरेसमवेत द्यावे.
(या व्यतिरीक्त या रोगांवर अनेक औषधे आयुर्वेदात आहे.)