ससून रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी ७०० कोटी रुपयांचा प्रस्ताव !
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुढील शंभर वर्षांसाठीचा ‘मास्टर प्लान’ सिद्ध !
पुणे – भविष्यकाळात ससून रुग्णालयात येणार्या रुग्णांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत उपलब्ध सुविधा अपुरा पडण्याची शक्यता गृहीत धरून प्रसिद्ध वास्तूविशारद क्रिस्तोफर बेनींजर यांनी पुढील शंभर वर्षांसाठी ससून रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाचा ‘मास्टर प्लॅन’ सिद्ध केला आहे. ससून रुग्णालय प्रशासनाने ७०० कोटी रुपयांचा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असून त्यापैकी १०० कोटी रुपये देण्याची सिद्धता सरकारने दर्शवली आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची १६ मजली इमारत बांधण्यात येणार असून त्यापूर्वी पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे आणि नर्सिंगचे वसतीगृह बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती बीजे मेडिकल कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी एस्. चोक्कलिंगम यांनी दिली.