भोसरी, पुणे येथील शांत आणि समंजस असणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. साची कुलकर्णी (वय १० वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. साची कुलकर्णी एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
उद्या ज्येष्ठ कृष्ण पक्ष तृतीया (२७.६.२०२१) या दिवशी कु. साची कुलकर्णी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई, मावशी आणि आजी-आजोबा यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. साची कुलकर्णी हिला दहाव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. सौ. सई कुलकर्णी (कु. साचीची आई)
१ अ. कु. साची बालपणापासूनच शांत आहे. ती कधी मस्ती करत नाही.
१ आ. समंजस: साचीचा भाऊ दीड वर्षांचा आहे. ती त्याला भरवते, त्याच्याशी खेळते आणि त्याची काळजी घेते. ती त्याला सांभाळते; म्हणून मी निश्चिंत होऊन सत्संग घेऊ शकते.
१ इ. साची स्वतःहून घरातील सेवांमधे साहाय्य करते. तिला ‘साहाय्य कर’, असे सांगावे लागत नाही.
१ ई. साची प्रतिदिन व्यष्टी साधनेचा आढावा देते.
१ उ. सेवा करायला आवडणे
१ उ १. बालसत्संगाचे नियोजन करून स्वतः सत्संग घेणे: होळीनिमित्त साचीने तिच्या स्तरावर बालसत्संगाचे नियोजन केले. त्यासाठी तिने स्वतःहून संपर्क केले. मला तिला काहीच साहाय्य करावे लागले नाही. तिने सत्संगात योग्य रितीने प्रार्थना, कृतज्ञता आणि नामस्मरण यांविषयी माहिती सांगितली.
१ उ २. ‘ऑनलाईन’ सत्संगासाठी साहाय्य करणे: सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ सत्संग घेण्यात येतात. भ्रमणभाषमध्ये काही अडचण निर्माण झाल्यास साची तत्परतेने ती अडचण दूर करते. त्या वेळी ती अन्य पर्यायही उपलब्ध करून देते. अन्य साधकांना ‘ॲप डाऊनलोड’ करण्यात काही अडचण निर्माण झाल्यास साची अडचण दूर करण्यास साहाय्य करते. दळणवळण बंदी लागू होण्यापूर्वी तिने वसाहतीत रहाणार्या परिचितांच्या घरी जाऊन ‘ॲप’ कसे ‘डाऊनलोड’ करायचे ? कसे वापरायचे ?’, याविषयी सांगितले.
१ उ ३. साची प्रतिदिन ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गात उपस्थित असते. ती तिची भावंडे आणि मैत्रिणी यांना ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गाला जोडण्याची आठवण करते.
२. सौ. रिमा देशपांडे (कु. साचीची मावशी)
२ अ. तिच्या बोलण्यात आणि वागण्यात नम्रता जाणवते.
३. श्री. राजेंद्र सांभारे आणि सौ. राजेश्वरी सांभारे (कु. साचीचे आजी-आजोबा)
३ अ. मोठ्यांचा आदर करणे: साचीला आमच्याविषयी अतिशय आदर आहे. ती घरातील सर्वांचे ऐकते आणि त्याप्रमाणे कृतीही करते.
३ आ. आवड-नावड नसणे : तिला खाण्या-पिण्याची आवड-निवड नाही. घरी जे बनवले जाते, ते ती आनंदाने खाते.
३ इ. नामस्मरणाची आवड : साचीला नामस्मरणाची आठवण करून दिल्यावर ती म्हणते, ‘‘माझे नामस्मरण चालू आहे.’’
३ ई. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : साचीला स्पंदने जाणवतात. काही वेळा ती बोलते, तसेच घडते. तिला काही वेळा पूर्वसूचना मिळतात.
३ उ. श्रद्धा : साचीची देवावर दृढ श्रद्धा आहे. साधना किंवा सनातन संस्था यांविषयी कुणी अयोग्य बोलल्यास ती त्यांना ठामपणे विरोध करते.
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |